रत्नागिरीत मृत पक्षी आढळले, कोल्हापुरात महानगर पालिका यंत्रणा सतर्क

Webdunia
शनिवार, 16 जानेवारी 2021 (20:52 IST)
बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी  शहरात अचानक मृत पक्षी आढळल्याने खळबळ उडाली आहे. शहरातल्या उद्यमनगरच्या महिला रुग्णालयात दोन कावळे मृतावस्थेत आढळले. आरोग्य विभागाने मृत कावळे ताब्यात घेतले आहेत.
 
कोल्हापूर शहरातील रंकाळा तलावाच्या पूर्वेकडील बाजूला असणाऱ्या किनाऱ्यावर दोन पक्षी मृतावस्थेत  आढळले. बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर रंकाळा परिसरात मृतावस्तेत पक्षी आढळल्यामुळे महानगरपालिकेची यंत्रणा सतर्क झाली झाली आहे. प्राथमिक तपासणी करून या पक्षांना उत्तरीय तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.  हे पक्षी परदेशी स्थलांतरित पक्षी असून स्पॉट बिल म्हणून ओळखले जातात असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

संबंधित माहिती

पुढील लेख