डीएसके दाम्पत्याच्या शोधाकरिता पुणे पोलिसांची चार पथके कार्यरत

शनिवार, 17 फेब्रुवारी 2018 (12:22 IST)
प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटक करण्यास पोलिसांना मुभा दिली आहे. त्यामुळे डीएसके दाम्पत्याच्या शोधाकरिता पुणे पोलिसांनी आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयु्रत निलेश मोरे यांच्या देखरेखीखाली चार पथके कार्यरत केली आहेत, अशी माहिती पोलीस उपआयु्क्त पंकज डहाणे यांनी दिली.
 
पैसे परत करण्याच्या नावाखाली वेळकाढूपणा करणार्‍या डीएसकेंना अटकेपासून दिलेले संरक्षण न्यायालयाने काढून घेतले. तसेच, त्यांचा पासपोर्ट जप्त करण्याचे आदेशही संबंधित यंत्रणांना दिले.
 
गुंतवणूकदारांकडून डीएसके यांनी मुदतठेवीच्या स्वरुपात कोट्यवधी रुपये जमा केले. त्याचा परतावा गुंतवणुकरांना वेळेत केला नाही. त्यामुळे आतापर्यंत चार हजार 99 गुंतवणुकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली आहे. त्यांच्या फसवणुकीची रक्कम 258 कोटी 21 लाख 16 हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे, तर ठेवीदारांकडून कर्जाच्या स्वरुपातही डीएसके यांनी रक्कम  गोळा केली असून त्याबाबत 39 कोटी 41 लाख 93 हजार रुपयांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी पोलिसांकडे दाखल झालेल्या आहेत. डीएसके यांच्या मालमत्ता विक्रीतून गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्याचा निर्णय शासन पुढील काळात घेऊ शकते.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती