महाराष्ट्राला बसणार फेंगल वादळाचा तडाखा, 6 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट

बुधवार, 4 डिसेंबर 2024 (08:55 IST)
Cyclone Fengal News : फेंगल चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातही दिसून येत आहे. महाराष्ट्रात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. हवामान विभागाकडून काही जिल्ह्यांना यलो अलर्टही देण्यात आला आहे. या चक्रीवादळामुळे थंडीचा प्रभाव कमी झाला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार आता या फेंगल चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातही दिसून येत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे. यासोबतच काही जिल्ह्यांत पावसाची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. चक्रीवादळ फेंगल हे अरबी समुद्रावरील कमी दाबाचे क्षेत्र आहे. भारतीय हवामान विभागाचे पुणे प्रमुख के एस होसाळीकर यांनी ट्विटरवर ही माहिती दिली.
ALSO READ: मुंबईमध्ये आज महायुतीच्या विधीमंडळ पक्षाची मोठी बैठक, समोर येणार मुख्यमंत्रीपदासाठीचे नाव
या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असून थंडी कमी झाली आहे. सांगली, सातारा, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धवाशिव, वाशीम, हिंगोली, बीड, संभाजीनगर जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या 24 तासांत फंगल चक्रीवादळ आणखी तीव्र होण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
 
हवामान विभागानुसार, फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव 5 डिसेंबर रोजी सहा जिल्ह्यांमध्ये अधिक असेल. सातारा, पुणे, रत्नागिरी, लातूर, सांगली, कोल्हापूर या सहा जिल्ह्यांना गुरुवारी हवामान विभागाने यलो अलर्ट घोषित केला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती