औरंगाबादच्या वैजापूर शहरात एका तरुणाला तलवारीने केक कापणे महागात पडले .त्याच्या वर आणि त्याच्या मित्रांवर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. जिल्ह्यात जमावबंदी आणि शस्त्रबंदी असताना सुद्धा शस्त्र जवळ बाळगून त्याचा सार्वजनिक ठिकाणी वापर केल्याने त्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे वाढदिवसाला काही हटके करणे त्यांना महागात पडले. सध्या जिल्ह्यात11 ते 25 डिसेंबर पर्यंत जमावबंदी आणि शस्त्रबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात कोणतेही शस्त्र सार्वजनिक ठिकाणी बाळगणे हे कायदेशीर गुन्हा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 17 डिसेंबर रोजी काही तरुण विनापरवाना बेकायदेशीर धारधार शस्त्र जवळ बाळगून एकत्ररित्या केक कापण्याची माहिती पोलिसांना मिळाली .पोलिसांनी या तरुणांवर जिल्ह्याधिकाऱ्याचे आदेशाचे उल्लंघन करण्यावरून वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.