गुन्हे शाखेची कारवाई ; नाशिक, सोलापूर, संभाजीनगरनंतर आता 'या' जिल्ह्यातील ड्रग्जच्या कारखान्याचा पर्दाफाश
पालघर : गेल्या काही दिवसांपासून राज्यात ड्रग्ज प्रकरण चांगलेच गाजत आहे. रोजच या प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत आहे. अशातच सोलापूर, नाशिक, संभाजीनगर नंतर आता पालघर जिल्ह्यात मिराभाईंदर गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. ड्रग्ज बनवण्यासाठीचा कच्चा माल देखील या कारवाई दरम्यान जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात होणाऱ्या सलग कारवाईंमुळे ड्रग्ज तस्करांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईमुळे पालघर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.