आतापर्यंत आढळलेल्या २१,९८८ कोरोनाबाधित पोलिसांमध्ये २३९८ पोलीस अधिकारी आणि १९,५९० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत १८ हजार ३७२ पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये १९५४ पोलीस अधिकारी आणि १६,४१८ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.