सोन्याबरोबर चांदीचे प्रतिकिलोचे दर 0.09 टक्क्याने वाढून 69 हजार 861 रुपयांवर गेले. मंगळवारी सोने दरात 900 रुपयांची तर चांदी दरात 4200 रुपयांची तेजी आली होती. अमेरिका-चीन यांच्यादरम्यानचा तणाव, कोरोना संक्रमण, आर्थिक अस्थिरता, कमी व्याजदर, इतर चलनाच्या तुलनेत कमजोर होत असलेला डॉलर आदी कारणांमुळे सोने-चांदीसह इतर धातूंच्या दरात प्रचंड तेजी आलेली आहे.