शिवप्रतिष्ठान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडें पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत आले आहे.लिव्ह इन रिलेशनशिप अयोग्य नाही, असं म्हणणाऱ्या न्यायाधीशांना त्या जागेवरून संपवलं पाहिजे, असं वक्तव्य शिवप्रतिष्ठान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडेंनी केलंय.
"मी बोलतोय त्याचा मला चटका बसेल. माझ्यावर गुन्हे दाखल होतील. काय गुन्हे दाखल करायचेत ते करूदेत," असं या पत्रकार परिषदेत बोलताना संभाजी भिडे म्हणाले.माज्या अशा बोलण्याने गुन्हे दाखल होतील, काय गुन्हे दाखल करायचे ते करून घ्या, असंही त्यांनी म्हटलंय