निवृत्तीवेतनधारकांच्या निधनानंतर कुटुंब निवृत्तीवेतनधारकास स्वतंत्र निवृत्तीवेतन खाते उघडावे लागत असे. कुटुंब निवृत्तीवेतनधारकांचा हा त्रास कमी करण्याच्या उद्देशाने आता या पद्धतीत सुधारणा करण्यात आली आहे. निवृत्तीवेतनधारकाच्या निधनानंतर कुटुंब निवृत्तीवेतनधारकाला नवीन बँक खाते उघडण्याची गरज नाही. त्यांना आवश्यक त्या विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून योग्य त्या कार्यवाहीनंतर त्यांच्या पूर्वीच्या संयुक्त खात्याद्वारेच कुटुंब निवृत्तीवेतन प्रदान करण्यात येईल. यासंबंधीचा शासन निर्णय वित्त विभागाने 14 नोव्हेंबर 2019 रोजी निर्गमित केला आहे.