भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये उध्दव ठाकरेंचा उल्लेख माफिया असा केला आहे. त्यामुळे राज्यात शिवसैनिक आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच यानंतर शिंदे गट काय करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ट्विट केल्यानंतर सोमय्या यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. तसेच दिपक केसरकर यांनी देखील या संदर्भात भाष्य केलं आहे.
सोमय्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले, गेल्या सरकारच्या डोक्यात सत्तेचा माज गेला होता. ज्या पध्दतीन सरकारचा दुरुपयोग करत होते ही एक प्रकारची माफियागीरीचं होती. माझ्यावर २२ आरोप करण्यात आले. संजय राऊत रोज सकाळ- संध्याकाळ शिवराळ भाषेत बोलायचे. दीड दमडीचा भ्रष्टाचार केला नसताना माझ्या कुटुंबाला जेलमध्ये टाकण्याची धमकी देण्यात आली. हिरामणी तिवारीचं मुडंण केलं.