स्मारकाचं काम पूर्ण करण्यासाठी आणि पुतळा प्रतिकृती नक्की करण्यासाठीच्या समितीचं लवकरच पुनर्गठन करण्यात येणार असल्याचंही मुंडेंनी म्हटलंय.बाबासाहेबांच्या इंदू मिलमधल्या स्मारकाचं काम दर्जेदार व्हावं याकडे लक्ष द्यावं आणि कामाच्या सध्याची स्थितीची माहिती दर्शनी भागात लावावी, अशा सूचना राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिल्या आहेत.