या तारखेपासून दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार हॉल तिकीट

मंगळवार, 30 जानेवारी 2024 (11:54 IST)
इयत्ता दहावीचे हॉल तिकीट आता बुधवार पासून 31 जानेवारीपासून मिळणार आहे. हे हॉल तिकीट त्यांना माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत मिळणार आहे. अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाने दिली आहे. 
 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा तर्फे मार्च मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी प्रवेश पत्र विद्यार्थी ऑनलाईन मिळवू शकतात. 
या वेळी बोर्डा कडून परीक्षेसाठी काही नियम बदलले आहे. परीक्षाची वेळ दहा मिनिटे वाढवून देण्यात आली आहे. आता परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर अर्धातास अगोदर पोहोचायचे आहे. उदाहरणार्थ परीक्षेची वेळ 11 ची असेल तर विद्यार्थ्यांना अर्धातास पूर्वी म्हणजे 10:30 वाजेच्या सुमारास पोहोचावे लागणार आहे. 
 
इयत्ता दहावीची प्रात्यक्षिक श्रेणी परीक्षा आणि तोंडी परीक्षा येत्या 10 फेब्रुवारी पासून तर लेखी परीक्षा येत्या 26 मार्च पासून सुरु होणार असून परीक्षेचे हॉल तिकीट उद्या 31 जानेवारी पासून मिळणार आहे. या साठी विद्यार्थ्यांना कोणतेही शुल्क लागणार नाही. 
 
 Edited by - Priya Dixit 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती