राठोड यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुकी

मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021 (16:29 IST)
वनमंत्री संजय राठोड अखेर पोहरादेवीत दाखल झाले. याठिकाणी संजय राठोड यांच्या समर्थनार्थ गडावर हजारो कार्यकर्ते दाखल झाले. संजय राठोड यांच्या समर्थनार्थ उपस्थित असलेल्या कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुकी झाली. यावेळी समर्थकांनी कोरोनाचे नियम धाब्यावर बसवले आणि संजय राठोड यांचं जल्लोषात स्वागत केलं.  
 
पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी झालेल्या आरोपांबाबत वनमंत्री संजय राठोड चौकशीला सामोरं जातील असे संकेत मिळत आहेत. राठोड यांनी चौकशीला सामोरं जावं अशी सूचना पोहरादेवी संस्थानने केली आहे. संजय राठोड यांच्यावरील ईडापिडा टळू दे आणि त्यांच्यावरील संकट दूर होऊ दे यासाठी पोहरादेवी गडावर महंतांकडून होमहवन केलं जातं आहे. एवढंच नव्हे तर राठोड यांच्यासाठी रेड कार्पेट टाकलं. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती