मुंबई पोलिसांची एक टीम गँगस्टर रवी पुजारीला बंगळुरूवरून घेऊन मुंबईत दाखल झाली आहे. मुंबई गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी ही माहिती दिली आहे. रवी पुजारीला मुंबई सत्र न्यायालयासमोर गजाली रेस्टॉरंटमधील गोळीबार प्रकरणी हजर करण्यात आलं. आता त्याला ९ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.