गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाने उच्छाद मांडला होता. कोरोनामुळे बऱ्याच जणांनी आपले प्राण गमावले होते. आता कोरोनाचा वेग मंदावला आहे. कोरोनामुळे लॉक डाऊन लावण्यात आले होते. माणसाचे धावणारे आयुष्य मंदावले गेले. आता कोरोनाचा प्रसार आणि प्रभाव कमी झाल्याने आयुष्य पुन्हा वेगाने सुरु झाले आहे. आता या संकटानंतर महाराष्ट्रात डेंग्यू आणि चिकनगुनियाचे प्रकरणे वाढत आहे. गेल्या चार वर्षाच्या तुलनेत राज्यात या वर्षी चिकनगुनियाचे प्रकरण वाढत आहे. ऑक्टोबर मध्ये चिकनगुनियाचे 2000 हुन अधिक रुग्ण आढळले आहे. चिकन गुनिया आणि डेंग्यू हे एकच डास एडिस इजिप्ती मादी डास ने चावल्याने होतो. हा आजार वेगाने प्रसरतो. चिकनगुनिया हा डासामुळे पसरणारा आजार आहे. हा आजार प्रामुख्याने आशिया, आफ्रिका, युरोप आणि अमेरिकेत आढळणारा आजार असून हा धोकादायक आहे. हा आजार एका संक्रमित व्यक्तीला चावल्यावर दुसऱ्या व्यक्तीला चावल्याने दुसऱ्या कडे वेगाने पसरतो. या आजाराची लक्षणे साधारणपणे 4 ते 6 दिवस दिसून येत नाही. हे डास दिवसात आणि दुपारच्या वेळी चावतात. राज्यातील पुणे ,नाशिक कोल्हापुरात या आजाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. वातावरण आणि बदलत्या राहणीमानामुळे डेंग्यू आणि चिकनगुनियाचे प्रमाण वाढत आहे. या डासाची अंडी पाण्याशिवाय देखील वर्षभर टिकून राहतात पाण्यात यांची संख्या झपाट्याने वाढते.