छत्रपती संभाजी महाराजांवर आक्षेपार्ह माहिती देण्याविरुद्ध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विकिपीडियाला आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्याचे आदेश दिले आहे. विकिपीडियावर छत्रपती संभाजी महारांच्या बाबत आक्षेपार्ह मजकूर टाकण्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून आक्षेपार्ह मजकूर टाकण्याऱ्यांवर कारवाई करण्याची माहिती मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे.
दरम्यान, माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्यांनी महाराष्ट्र सायबर सेलच्या महानिरीक्षकांना विकिपीडिया अधिकाऱ्यांशी बोलण्यास आणि साइटवर असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध 'आक्षेपार्ह' मजकूर काढून टाकण्यास सांगितले आहे. यासोबतच, त्यांनी सांगितले की, ऐतिहासिक तथ्यांचा विपर्यास करणाऱ्या ओपन-सोर्स प्लॅटफॉर्मवर हे असे लेखन ते सहन करणार नाहीत. त्यांनी सांगितले की, आवश्यक ती पावले उचलण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.