Eknath Shinde News : आज महाराष्ट्रात नवीन मुख्यमंत्रिपदाच्या निवडीपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर लगेचच नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तयारी सुरू होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि पुढील सरकारचा शपथविधी होईपर्यंत राज्यपालांनी त्यांना हंगामी मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील राजभवनात राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसही उपस्थित आहे.