शुक्रवारी नागपूर जिल्ह्यातील उमरेड एमआयडीसीमध्ये अॅल्युमिनियम फॉइल बनवणाऱ्या कंपनीत आग लागली. शनिवारी अॅल्युमिनियम उत्पादने बनवणाऱ्या कारखान्यात झालेल्या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या दोन कामगारांचा मृत्यू झाल्यानंतर मृतांची संख्या पाच झाली.चंद्रशेखर बावनकुळे यांनी मृतांच्या कुटुंबियांना भरपाई जाहीर केली होती. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र सरकार मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.
मुख्यमंत्र्यांनी उपचार घेत असलेल्या रुग्णांची पाहणी केली. या वेळी ते म्हणाले, उमरेड येथील एमपीएम कंपनीत घडलेली घटना दुर्देवी आहे. या अपघातात ज्या कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले आहे. त्यांच्या सोबत सरकार आहे .जखमी कामगारांच्या उपचारात कोणतीही कमतरता भासणार नाही. गरज पडल्यास रुग्णांना एअर अॅम्ब्युलन्स द्वारे ऐरोलीच्या रुग्णालयात हलविण्यात येईल.
रुग्णांच्या उपचारांची माहिती घेत असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपुरात स्किन बँकेची तातडीची गरज असल्याचे लक्षात आले आणि त्यांनी तातडीने जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्याशी संपर्क साधला आणि नागपुरात आधुनिक स्किन बँक स्थापन करण्याचे निर्देश दिले. नागपूरला शेजारच्या राज्यांमधून मोठ्या संख्येने गंभीर आजारी रुग्ण येतात ज्यांना त्वचा प्रत्यारोपणाची आवश्यकता असते. डॉक्टरांकडून अधिक माहिती मिळाल्यानंतर सरकारी पातळीवर लवकरच कारवाई पूर्ण केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, रुग्णालयाच्या क्रिटिकल केअर प्रमुख डॉ. जैसा राजपूत, स्किन सर्जन डॉ. एस. जहागीरदार, पोलिस अधीक्षक हर्ष पोतदार, माजी आमदार सुधीर पारवे आदी उपस्थित होते.