गेल्या चार पाच दिवसांत राज्य शासनाने तब्बल दीडशेहून अधिक शासन निर्णय काढले आहेत. तसेच काही वेळातच मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्य सरकारला मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनांची आठवण करून दिली आहे. त्य़ांनी ट्विट करत कायमस्वरूपी नियुक्तीची मागणीही केली आहे.