येवल्याच्या नवरदेवाची फसवणूक, लग्नानंतर एक महिन्यात मुलगी माहेरी

मंगळवार, 29 मार्च 2022 (15:19 IST)
बोगस लग्न लावून देत फसवणूक करणाऱ्या दोन संशयितांना येवला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.साहेबराव गीते आणि संतोष फड असे संशयितांची नावे आहेत. सध्या लग्नाचा सिझन सुरू असून अशातच लग्न जमवणाऱ्या दोन एजंटांनी मुलाच्या कुटुंबीयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

येवला येथील कुटुंबीय आपल्या स्थळ शोधत होते. अशातच त्यांना दोन लग्न जमवणारे एजंट भेटले. या दोघांना मुलाच्या कुटुंबियांना विश्वासात घेत कुटुंबाकडून तीन लाख रुपये घेऊन बीडच्या मुलीशी लावून देण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे येवला येथील मुलगा आणि बीडची मुलगी असा विवाह सोहळा ही पार पडला.

बीड येथील अंबेजोगाई गावाजवळ एका मंदिराबाहेरच लग्न लावण्यात आले होते. मात्र लग्नानंतर एक महिन्यातच मुलगी आपल्या आईसोबत माहेरी निघून गेली. यावर मुलाच्या कुटुंबीयांनी मुलीच्या आईला जाब विचारला असता मुलीच्या आईने सांगितले की, ‘फक्त एक महिन्यासाठीच मुलगी देण्याचे ठरले होते, अशी मुलीच्या आईने माहिती देताच मुलाच्या कुटुंबाला धक्काच बसला.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मुलाच्या आईने येवला पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर येवला पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत लग्न जमवणाऱ्या दोन्ही एजंटांना ताब्यात घेतले आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती