Chandrapur : जंगलात दगडाने ठेचून युवकाची निर्घृण हत्या

बुधवार, 11 ऑक्टोबर 2023 (19:09 IST)
चंद्रपूरच्या राजुरा शहरालगत रामपूरच्या वस्तीत रामपूर वस्तीत वॉर्ड क्रमांक दोन साई मंदिर जवळ राहणाऱ्या एका तरुणाची रामपूरच्या जंगलात अज्ञात व्यक्तींनी दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संदीप देवराव निमकर असे या मयत तरुणाचे नाव आहे. 
 
रामपूर येथे संदीप निमकर आपल्या आई वडिलांसह राहत होता. रोज सोमवार रात्री आठ वाजता घरून निघून गेला. तेव्हापासून बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबीयांनी पोलिसात केली. कुटुंबियांना त्याचा शोध घेत असता रामपूरच्या लगत असलेल्या जंगलात माथरा रोड जवळ शोध घेत असताना. झुडपात छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळला. या घटनेची 

माहिती पोलिसांत दिली असता. त्यांनी घटनास्थळ गाठून पोलिसांनी पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले आहे.  
 
 





Edited by - Priya Dixit 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती