छगन भुजबळ यांच्या भवितव्यावर आज फैसला

शुक्रवार, 4 मे 2018 (09:36 IST)
महाराष्ट्र सदनासह इतर अनेक गैरव्यवहारप्रकरणी मनी लाँडरिंग कायद्याखाली अटकेत असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या भवितव्यावर आज फैसला होणार आहे.  मुंबई उच्च न्यायालयात त्यांच्या जामिनावर आज अंतिम सुनावणी होणार असून भुजबळ यांना जामीन मिळू नये यासाठी ‘ईडी’ने  युक्तिवाद पूर्ण झाला आहे.
 
छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता, परंतु सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज पेâटाळून लावल्याने त्यांनी हायकोर्टात धाव घेतली. न्यायमूर्ती पी. एन. देशमुख यांच्या समोर आज याप्रकरणी सुनावणी घेण्यात आली त्यावेळी भुजबळ दोषी असून त्यांना जामीन देण्यात येऊ नये असा युक्तिवाद  अ‍ॅड. हितेन वेनेगावकर यांनी केला. परंतु दोन वर्षांहून अधिक काळापासून तुरुंगात असून आपण आजारी आहोत, तसेच पीएमएलए कायद्याचे ४५(१) हे कलमही नुकतेच रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे जामिनावर सुटका करावी असा युक्तिवाद भुजबळ यांच्या वतीने करण्यात आला होता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती