सोने किंमतीत मोठी घट, वर्ल्ड गोल्ड काऊंसिलचा दुजोरा

शुक्रवार, 4 मे 2018 (09:34 IST)
सोन्याच्या किंमतीत लवकरच मोठी घट होणार असून वर्ल्ड गोल्ड काऊंसिलने नव्या रिपोर्टमध्ये याला दुजोरा दिलाय. रिपोर्टनुसार, २०१८मधील पहिल्या तिमाहीत म्हणजेच जानेवारी ते मार्चदरम्यान जागतिक स्तरावर सोन्याच्या मागणीत घट होत ती ९७३.५ टन राहिलीये. गेल्या १० वर्षातील ही सर्वात कमी मागणी आहे. वर्ल्ड गोल्ड काऊंसिलच्या रिपोर्टनुसार पहिल्या तिमाहीत भारतात सोन्याच्या ज्वेलरीची डिमांड १२ टक्क्यांवर घसरली. गेल्या १० वर्षात एखाद्या तिमाहीत तिसऱ्यांदा इतकी मोठी घसरण झालीये.
 
भारतात जानेवारी ते मार्च २०१८ दरम्यान ज्वेलरीसाठी केवळ ८७.७ टन सोन्याचा वापर झाला. हाच आकडा २०१७मध्ये ९९.२ टन इतका होता. वर्ल्ड गोल्ड काऊंसिलच्या मते जानेवारी ते मार्च २०१८ दरम्यान भारतात लग्नांचे प्रमाण कमी होते. ज्यामुळे ज्वेलरीसाठी सोन्याची मागणी घटली. वर्ल्ड गोल्ड काऊंसिलच्या मते भारतात ज्वेलरीची मागणी घटल्याने जागतिक स्तरावर ज्वेलरीसाठी सोन्याची मागणी १ टक्क्यांनी घटली. जागतिक स्तरावर या दरम्यान सोन्याच्या ज्वेलरीसाठी ४८७.७ टक्क्यांची सोन्याची विक्री झाली. तर वर्ल्ड गोल्ड काऊंसिलच्या रिपोर्टनुसार जानेवारी ते मार्चदरम्यान जागतिक स्तरावर गुंतवणुकीसाठी  सोन्याच्या मागणीत घट झाली. भारतात गुंतवणुकीसाठी सोन्याच्या मागणीत १३ टक्के घट झाली. चीनमध्ये यात २६ टक्के घसरण झाली. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती