महाराष्ट्र सदन आणि इतर गैरव्यवहारांप्रकरणी तुरूंगात असलेल्या छगन भुजबळ यांच्या जामीन अर्जावर सोमवारी निर्णय होणार आहे. छगन भुजबळ हे राज्याचे माजी बांधकाम मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मोठे नेते आहेत. त्यामुळे विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश एम़ एस़ आजमी यांच्यासमोर भुजबळांच्या जामीनावर सुनावनी होणार असून, न्यायाधीश जामीन अर्जावर काय निर्णय देतात याबाबत उत्सुकता आहे.