'सतत सेल्फी काढावसे वाटणे' एक मानसिक रोग

सोमवार, 18 डिसेंबर 2017 (10:04 IST)
सतत सेल्फी काढावसं वाटणं हा एक मानसिक रोग असल्याचं एका संशोधनातून समोर आलं आहे. 'द सन'च्या वृत्तातून ही माहिती समोर आली आहे. नॉटिंघम ट्रेंट युनिव्हर्सिटी आणि थियागररॉजर स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या संशोधकांनी हे संशोधन केलं आहे. शिवाय यातून सहा मुद्देही समोर आणले आहेत. ही एक अशी परिस्थिती आहे, ज्यामध्ये हातात मोबाईल नसल्याची व्यक्तीला भीती वाटते. हातात मोबाईल नसल्यास अस्वस्थता वाढते.

'selfitis' चा अभ्यास करताना 200 भारतीयांचा समावेश करण्यात आला होता. कारण भारतामध्ये फेसबुकचे युझर्स मोठ्या प्रमाणात आहेत. शिवाय धोकादायक ठिकाणी सेल्फी घेताना मृत्यू झाल्याच्या अनेक घटनाही भारतात समोर आलेल्या आहेत. selfitis Behaviour Scale ने भारतीयांची चाचणी करण्यात आली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती