संजय राऊत म्हणाले, "राज्यातील तपास यंत्रणा सक्षम असताना केंद्रीय यंत्रणा मागच्या दाराने आणल्या जात आहेत. केंद्रीय यंत्रणा कुणाच्या तरी दबावाखाली काम करत असतील, तर हे संघराज्य व्यवस्थेला हानिकारक आहे."
"शरद पवार म्हणतात ते बरोबर आहे की, सत्ता गेल्यामुळे निराशा आणि वैफल्यातून अशा चौकशांचा ससेमिरा मागे लावला जात आहे," असंही राऊत म्हणाले.
यावेळी संजय राऊतांनी प्रताप सरनाईकांच्या पत्राबाबतही भाष्य केलं.
"प्रताप सरनाईक यांच्या पत्रात विनाकारण त्रास दिला जात असल्याचा उल्लेख आहे, हे मी वारंवार सांगतोय. या तक्रारींचा राज्याचे पोलीस, तपास यंत्रणा निष्पक्षपणे तपास करू शकतात. न्यायालयं आहेत. पण मागच्या दाराने केंद्रीय तपास यंत्रणा आणल्या जात आहेत," असं राऊत म्हणाले.