धुळ्यातील शंकर मार्केटमध्ये भीषण आग

सोमवार, 28 जून 2021 (09:29 IST)
धुळ्याच्या पाचकंदील परिसरातील  कापडाच्या मार्केटमध्ये भीषण आग लागल्याने अनेक दुकानं जळून खाक झाली आहेत. आग विझवण्याचे काम सुरू असून सुदैवाने या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
 
मिळालेल्या माहितीनुसार ही आग पहाचेच्या सुमारास लागली आहे. कपड्यांची दुकाने असल्यामुळे बघता बघता आगीने रौद्ररुपधारण केलं. मार्केटमधील इतर दुकानंही आगीच्या भक्षस्थानी सापडली आहे. आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.  सुदैवाने, अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती