बैलाची जेसीबीने अमानवीय हत्या, व्हिडियो प्रचंड व्ह्याराल, दोघांवर गुन्हा, हत्येचे हे आहे कारण

बैल हा बळीराजाचा मित्र असतो, शेतकरी त्याला त्याच्या घरातील एका सदस्या प्रमाणे काळजी घेतो. मात्र काही दिवसापासून एक अमानवीय असा व्हिडियो सर्वत्र व्हायरल झाला होता, यामध्ये फार क्रूर आणि अमानवीय पद्धतीने बैलाची हत्या करत हा व्हिडियो शूट केला गेला होता. जेसीबीने बैलाची हत्या केल्याचा व्हायरल व्हिडीओ पुण्यातील इंदापूरचा असल्याची माहिती उघड झाली. याप्रकरणी इंदापूर तालुक्यातील पोंदवडी येथील दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. 
 
भिगवण पोलिसांनी गोट्या उर्फ रोहित शिवाजी आटोळे, भाऊसाहेब अण्णा खारतोडे या दोघांवर प्राण्यांना क्रूरतेने वागवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, गेल्या 27 ऑक्टोबरला या दोघांनी जेसीबीच्या सहाय्याने पिसाळलेल्या बैलाला निर्घृणपणे ठार केले होते. पिसाळलेल्या बैलाची जेसीबीच्या सहाय्याने निर्घृण हत्या केल्याचा एक व्हिडीओ मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला. या बैलाला ठार केल्यानंतर पिसाळलेल्या बैलापासून सुटका झाल्याची भावना परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात असल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला. हा व्हिडीओ पुण्याच्या इंदापूरचा असल्याचं आता समोर आलं आहे.
 
या व्हिडिओमध्ये दिसणारा बैल हा पिसाळलेला आहे असे सांगितले जात आहे. तर या परिसरातील नागरिकांमध्ये त्य़ाच्यामुळे भितीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे गावकऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने बैलाला काही क्षणातच ठार केले. यावेळी कुणीही या बैलाबाबत सहानुभूती दर्शवली नाही, उलट गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला असे कारण आता समोर येते आहे. हा व्हिडीओ पाहिल्य़ानंतर माणसातील क्रूरता पुन्हा एकदा समोर आली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती