जळगावात जुन्या वैमनस्यातून रक्तरंजित हाणामारी, एक जण ठार, 7 जण जखमी, 9 जणांवर गुन्हा दाखल
जळगावात ऑनर किलिंगच्या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली. घरातून पळून जाऊन प्रेमविवाह करणाऱ्या मुकेश रमेश शिरसाठ या तरुणाची रविवारी सकाळी आठच्या सुमारास पिंप्राळा परिसरात तरुणीच्या कुटुंबीयांनी हत्या केली. शहरातील पिंप्राळा परिसरात रविवारी सकाळी झालेल्या रक्तरंजित हाणामारीत एक तरुण ठार तर सात जण जखमी झाल्याची घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश रमेश शिरसाठ (30 वर्षे) या तरुणाचा काही महिन्यांपूर्वी परिसरातील काही तरुणांशी वाद झाला होता. या वादाला शनिवारी रात्री पुन्हा हिंसक वळण लागले असून रविवारी सकाळी आठच्या सुमारास सात ते आठ हल्लेखोरांनी शिरसाठ कुटुंबीयांवर चाकू, कुऱ्हाडी व काठ्यांनी हल्ला केला.
या हल्ल्यात मुकेश शिरसाठ व्यतिरिक्त निळकंठ सुखदेव शिरसाठ (45), कोमल निळकंठ शिरसाठ (20), निळकंठ शिरसाठ, ललिता निळकंठ शिरसाठ (30) आणि सनी निळकंठ शिरसाठ (21) हे गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता मुकेश शिरसाठ यांचा मृत्यू झाला.