ठाण्यात मॅट्रिमोनियल साइटवरून 30 महिलांची फसवणूक, आरोपीला अटक

सोमवार, 20 जानेवारी 2025 (15:41 IST)
ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा पोलिसांनी बनावट कॉल सेंटर चालवण्याऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. बनावट कॉल सेंटर चालवणे आणि महिलांची फसवणूक करण्यासाठी मॅट्रिमोनियल साइटवर बनावट मॅट्रिमोनिअल प्रोफाइल तयार केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत 30 महिला याच्या बळी ठरल्या असून, त्यांच्याकडून अंदाजे 1 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याशिवाय, चॅटिंग वेबसाइटसाठी वापरलेले 9 लॅपटॉप आणि राउटर मुंब्रा पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले आहेत.

मुंब्रा पोलिस ठाण्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांचे पथक या प्रकरणाचा सातत्याने तपास करत होते हे महिलांची फसवणूक लग्नाचे आमिष देऊन ऑनलाइन फसवून करायचे. यावेळी भोपाल मधून एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याने मुख्य सूत्रधारची माहिती दिली. त्यावरून दुसऱ्या आरोपीला लखनौ मधून अटक करण्यात आली आहे. एजाज अहमद इम्तियाज असे मुख्य आरोपीचे नाव असून त्याला  22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 
Edited By - Priya Dixit  
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती