अमरावती : शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्यानंतर राज्यातील राजकीय वातवरण ढवळून निघालं आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी ज्या पद्धतीनं सर्व मर्यादा ओलांडत चप्पल आणि दगडफेक करत शरद पवार यांच्या घराच्या परिसरात प्रवेश केला. त्यावरून ते एसटी कर्मचारी होते की नाही असा प्रश्नही उपस्थित करण्यात येतोय. सध्या पोलिसांनी या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींना न्यायालयीन कोठडी तर आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यावर शरद पवार यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. तसंच महाविकास आघाडी सरकारला त्रास देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील त्यांनी भाजपवर केला.