षडयंत्र भाजपचं; नितीन देशमुख यांचा गौप्यस्फोट

बुधवार, 22 जून 2022 (22:18 IST)
आपण स्वबळावर आमदार झालो नाही.आपल्या मागे बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे. मतदारसंघातील शिवसैनिकांनी आपल्यासाठी जिवाच रान केल आहे. ज्या मतदारांनी तुम्हाला शिवसैनिक म्हणून निवडून दिलं त्या पदाचा आदर करावा. आणि भविष्याचा विचार करून तुम्ही पुन्हा परत या असे आवाहन नितीन देशमुख यांनी केलं. याच बरोबर हे षडयंत्र एकनाथ शिंदे यांचे नसून भाजपचे असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना केला.
 
एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आमदार जातील मात्र मतदार जाणार नाही. पक्ष हा कार्यकर्त्यावर अवलंबून असतो. आमदार आमदारांवर अवलंबून नसतो. भविष्यातील विचार करून त्यांनी परत यावं. चुकीच्या पद्धतीने भाजपा प्रचार करत आहे. ईडीच्या कारवाईच्या दबावामुळे काही आमदार बळी पडले आहेत. ईडीचा दबाव टाकून महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये (BJP) धमक असेल तर निवडणूक लावून दाखवा. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती