भाजप शिवसेनेचा कायमचा शत्रू आहे असे नाही : नीलम गोऱ्हे

शुक्रवार, 6 ऑगस्ट 2021 (22:16 IST)
राजकारणात कायमचे कोणी कोणाचे शत्रू नसते, आज भाजपशी केवळ मतभेद असले तरी तो पक्ष शिवसेनेचा कायमचा शत्रू आहे असे नाही. या पक्षांच्या युतीबाबत मी बोलत नाही, मात्र भविष्यात काय होऊ शकते सांगता येत नाही, असे वक्तव्य विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शुक्रवारी जळगावात केले. या सोबतच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीतून ते एकत्रदेखील येऊ शकतात, मात्र कार्यकर्त्यांचे काही खरे वाटत नाही, असेही स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. 
 
भाजप व शिवसेना यांची पुन्हा युती होऊ शकते का, या विषयावर डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, या विषयी पक्षप्रमुख, प्रवक्ते बोलतील. मात्र ज्या वेळी या दोन्ही पक्षाची युती होती, त्या वेळी मीदेखील समन्वय समितीमध्ये होते. ही युती का तुटली, ज्या मुद्यावर मतभेद झाले याकडेदेखील लक्ष देणे गरजेचे आहे. युतीच्या वेळी जे ठरले त्यात विश्वासघात झाल्याने आम्ही इतर पक्षांकडे वळलो, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती