खिचडी घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट; ठाकरेंचा आणखी एक पदाधिकारी अडचणीत.....
गुरूवार, 21 सप्टेंबर 2023 (08:01 IST)
खासदार गजनान किर्तीकर यांचे सुपुत्र अमोल किर्तीकरांची खिचडी घोटाळा प्रकरणात चौकशी होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांच्या चौकशा सुरु आहेत.
यात आता अमोल किर्तीकर यांचेही नाव समोर आले आहे. अमोल किर्तीकर हे उद्धव ठाकरे यांच्या गटातून उत्तर पश्चिम लोकसभेसाठी उमेदवार असू शकतात.