ठाकरे गटाला मोठा धक्का ! माजी महापौर किशोरी पेडणेकरांवर गुन्हा दाखल

शनिवार, 5 ऑगस्ट 2023 (16:23 IST)
माजी महापौर किशोरी पेडणेकर या मोठ्या अडचणीत आल्या असून यांच्या  वर कथित कोविड सेंटर घोटाळ्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात किशोरी पेडणेकर यांचा वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बॉड बँग खरेदीत किशोरी पेडणेकरांनी घोटाळा करण्याचा आरोप ईडीने केला आहे. हे कोविड सेंटर घोटाळा प्रकरण कोरोना काळातील असून किशोरी यांच्यासह महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. 
 
कोविडमध्ये मृत्युमुखी झालेल्यांना नेण्यासाठी वापरण्यात आलेल्या बॉडी बॅग ची किंमत 2000 रुपये ऐवजी 6800 रुपयांना खरेदी केली असून बॉडी बॅगचे व्यवहार पेडणेकरांच्या निर्देशानुसार झाले.त्या वेळी किशोरी पेडणेकर या मुंबई महानगरपालिकेच्या महापौर होत्या.कोविड काळातील झालेल्या या घोटाळ्यात किशोरी पेडणेकर सहभागी असल्याचं ईडीने म्हटल्यावर त्यांच्यावर चौकशी होणार असल्याची चर्चा सुरु होती. त्यानंतर किशोरी पेडणेकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 


Edited by - Priya Dixit   
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती