संतोष देशमुख खून प्रकरणात मोठा खुलासा, आरोपीने हत्येपूर्वी या ज्येष्ठ नेत्याला 16 वेळा फोन केले

सोमवार, 30 डिसेंबर 2024 (13:53 IST)
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाच्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. य प्रकरणात आरोपींने देशमुख यांच्या हत्येपूर्वी एका वरिष्ठ नेत्याला 16 वेळा फोन केल्याची धक्कादायक माहिती सीआयडी तपासात समोर आली आहे. मात्र तपास यंत्रणेने नेत्याचे नाव उघड केले नाही. किंवा याला दुजोरा देखील दिला नाही. सीआयडी अजून आरोपींच्या कॉल डिटेल्सचा तपास करत आहे. 

संतोष देशमुख यांच्या हत्ये दरम्यान झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ सीआयडीने आरोपी सुदर्शन घुलेंच्या मोबाईल वरून जप्त केला असून हत्येननंतर आरोपी कार सोडून पळाला. आरोपीच्या कारमध्ये दोन मोबाईल सापडले असून, त्यातील कॉल डिटेल्सवरून असे स्पष्ट झाले आहे की, हत्येच्या वेळी आरोपीच्या मोबाईलवरून एका ज्येष्ठ नेत्याला 16 कॉल्स आले होते.
 
या हत्येचा तपास करण्यासाठी सीआयडीने तीन पथके तयार केली आहेत. सीआयडीने अनेक लोकांचे कॉल रेकॉर्ड काढण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय वाल्मिक कराडच्या दोन्ही अंगरक्षकांचे मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी जप्त करण्यात आले आहेत.सीआयडीचे पथक रविवारी मस्साजोग येथे खून प्रकरणाच्या तपासासाठी व चौकशीसाठी गेले होते.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही परभणी हिंसाचार आणि सरपंचाच्या हत्येची न्यायालयीन चौकशी आणि देशमुख आणि सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती
 
Edited By - Priya Dixit
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती