जितेंद्र आव्हाड यांचा आमदारकीचा राजीनामा, ट्वीटद्वारे केलं जाहीर

सोमवार, 14 नोव्हेंबर 2022 (08:31 IST)
राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड हे त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा अर्थात आमदारकीचा राजीनामा दिला. त्यांनीच तशी माहिती ट्विटरवरून दिलीय. जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, "पोलिसांनी माझ्याविरुद्ध 72 तासांत 2 खोटे गुन्हे दाखल केले आणि तेही 354 चे. मी या पोलिसी आत्याचाराविरुद्ध लढणार. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे. लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत."
https://twitter.com/Awhadspeaks/status/1591952797968510976
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती