शिक्षक भरती आता पवित्र पोर्टलद्वारे होणार, काही सुधारणा जाहीर

शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2022 (07:34 IST)
राज्यातील शिक्षक भरती आता पवित्र पोर्टलद्वारे करण्यात येणार आहे. यासाठी काही सुधारणाही जारी करण्यात आल्या आहेत. याअंतर्गत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनाच्या प्राथमिक उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची पदे भरली जाणार आहेत.
 
कार्यपद्धतीमधील बदल आणि सुधारणा खालीलप्रमाणे
 
-उमेदवाराला प्रत्येक वेळी होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होणे अनिवार्य राहील.
- उमेदवाराच्या त्यापूर्वीच्या चाचणीतील गुण नवीन चाचणीचा अंतिम निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत.
- शिक्षक भरती पदासाठी व्यवस्थापनाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या दिनांक असलेले उमेदवाराचे वय विचारात घेण्यात येईल.
- तसेच सन 2022 मध्ये होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीनुसार येणाऱ्या जाहिरातीसाठी उमेदवाराचे वय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षासाठी शिथिल करण्यात आले आहे.
- शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी प्रविष्ट होण्यासाठी उमेदवारास किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणे अनिवार्य असेल.
- शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीकरिता उमेदवारांनी निवडलेले माध्यमिक केवळ त्या चाचणी परीक्षेत राहील.
- शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीनंतर पद भरतीसाठी आवश्यकतेनुसार तीन महिन्यातून एकदा व्यवस्थापनाकडून पोर्टलवर जाहिराती घेण्यात येतील.
- त्यात त्या-त्या कालावधीमध्ये आलेल्या जाहिरातीसाठी पात्र उमेदवारांकडून एकत्रित प्राधान्यक्रम घेऊन शिफारस पात्र उमेदवारांची व्यवस्थापननिहाय यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
- विविध टप्प्यांमध्ये जाहिरात येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवडीसाठी शिफारस झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी पात्र राहील.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती