बहुचर्चित महिला डॉक्टर सुवर्णा वाजे खून प्रकरणाचा उलगडा झाला,'हा' निघाला खुनी

गुरूवार, 3 फेब्रुवारी 2022 (21:15 IST)
नाशिक शहरातील बहुचर्चित वाजे खून प्रकरणाचा उलगडा झाला आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांना डॉ. सुवर्णा वाजे यांच्या मारेकरीला शोधण्यास यश आहे.डॉ. सुवर्णा वाजे खून प्रकरणात त्यांचे पती संदीप वाजे हेच असून नाशिक पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. वाजे यांच्या हत्येत त्यांच्या पतीचा समावेश असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.गेल्या (दि. २६ जानेवारी) वाडीवऱ्हे परिसरात पोलिसांना जळालेल्या अवस्थेत गाडीसह मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह डॉ. सुवर्णा वाजे यांचा असल्याची प्राथमिक माहिती होती.
 
याप्रकरणी पोलिसांनी तपासाला गती देत वाजे यांच्या बहिणीसह रुग्णालयातील सहकाऱ्यांचे जबाब नोंदवले. माहेरच्या लोकांकडून तसेच पतीकडून माहिती घेण्यात आली. मात्र कुणालाच काहीच माहित नव्हते. पोलिसांनी शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरेही तपासले. अखेर या हत्येचे गूढ उकलण्यास पोलिसांना यश आले. कौटुंबिक वादातून पतीनेच सुवर्णा वाजे यांची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. मात्र सुवर्णा वाजे आणि त्यांच्या पतीमध्ये नेमका काय वाद होता आणि त्यांच्या पतीने कसा त्यांचा काटा काढला, याबाबत अद्याप कळू शकले नाही. पोलीस याबाबत सखोल चौकशी करीत आहेत.
 
नाशिक महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांचा एका गाडीत जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. या घटनेप्रकरणी आता नवी माहिती समोर आली आहे. जळालेल्या गाडीत  आढळलेल्या मृतदेहाचा डीएनए अहवाल आला आहे. या अहवालानुसार, मृतदेहाचा डीएनए आणि डॉ. सुवर्णा वाजे यांचा डीएनए एकच असल्याचं निष्पन्न झाले आहे. त्यामुळे डॉ. सुवर्णा वाजे यांची हत्या केली असावी असं दिसून येत आहे.
 
डॉ. सुवर्णा वाजे या नाशिक महानगरपालिकेच्या सिडको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. 25 जानेवारी रोजी शहरालगत असलेल्या रायगड नगर परिसरात एका जळालेल्या कारमध्ये मृतदेह आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली. डॉ. सुवर्णा वाजे या बेपत्ता होत्या. त्या संदर्भात त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार सुद्धा दिली होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती