भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात येरली येथे एका आदिवासी आश्रम शाळेत 37 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या विद्यार्थ्यांनी जेवणात वरण ,भात, बटाटा, वाटाणा चपाती घेतली होती. जेवल्यानंतर काही वेळाने विद्यार्थ्यांचा पोटात दुखू लागले त्यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या37 विद्यार्थ्यांपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
दररोज प्रमाणे गुरुवारी दुपारी विद्यार्थ्यांना जेवण दिले त्यात बटाटा, वाटाणा, चपाती, वरण, भात दिले. विद्यार्थ्यांनी जेवण केल्यावर काहीच वेळात त्यांच्या पोटात दुखायला लागले तर काहींना चक्कर आली. मुलांनी त्याची तक्रार शिक्षकांकडे केली असता त्यांनी दुर्लक्ष केले.