पंढरपूर मतदारसंघाचे आमदार दिवंगत भारत भालके यांचे निधन झाल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी राष्ट्रवादीकडून शरद पवार यांच्या मान्यतेने पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भगीरथ भारत भालके यांना अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने म्हटले आहे.