ठाण्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्या पक्षाचे बॅनर फाडले, 5 जणांवर गुन्हा दाखल

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना (BSS) पक्षाने लावलेले बॅनर फाडल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली.
 
एका माजी नगरसेवकाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे, कळवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 
 
तक्रारीनुसार, कळव्यातील विटावा परिसरात मोटारसायकलवरून आलेल्या आरोपीने फिर्यादीच्या घराजवळ येऊन 27 मे रोजी पहाटे तिला शिवीगाळ करून त्यांच्यावर विटा फेकल्याची घटना घडली. त्यांनी परिसरात विविध योजना सुरू करण्याची घोषणा करणारे BSS चे बॅनरही फाडले, असे अधिकाऱ्याने सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती