गांधी स्मारक चालते मग बाळासाहेबांचे का नाही!

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा वाद आता कोर्टात गेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकारण सुरु झाले आहे. यावर सुभाष देसाई यांनी तर गांधी विरुद्ध ठाकरे असा पवित्रा घेतला आहे. त्यांनी गांधी आणि ठाकरे यांची तुलनाच केली आहे. 
 
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावरुन सुभाष देसाई यांनी ही तुलना केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक दादरमधील शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्याच्या जागेत उभारले जाणार आहे असे सर्व काम महापालिकेने सुरु केले आहे. मात्र कोर्टात याविरोधात याचिका दाखल केली आहे. यावर शिवसेना आक्रमक झाली आहे. 
 
देसाई म्हणतात की ‘कोणत्याही घटनात्मक पदावर नसताना महात्मा गांधी यांचे स्मारक उभारले जाते, मग बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक का उभारु नये ?’ असा सवाल सुभाष देसाई यांनी उपस्थित केला. पत्रकारांशी बोलताना स्मारकावरुन प्रश्न उपस्थित करत साई यांनी महात्मा गांधी आणि बाळासाहेब ठाकरे यांची तुलना केली. ‘ज्यावेळी कोणत्याही महान नेत्याच्या स्मारकाच्या उभारणीची चर्चा होते, त्यावेळी आक्षेप नोंदवले जातात,’ असेदेखील सुभाष देसाई यांनी म्हटले. त्यामुळे आता अजून तरी कोर्ट जो पर्यंत परवानगी देत नाही तो पर्यंत स्मारक उभे करने अवघड होणार आहे.

वेबदुनिया वर वाचा