सदर घटना वाळूजच्या पंढरपूर येथे गुरुवारी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली आहे. पीडित मुलीचे घर पंढरपूरच्या एका मंदिरामागे आहे. दररोज संध्याकाळी या मंदिरात हरिपाठ असतो. त्यामुळे दररोज प्रमाणे चिमुकली हरिपाठ सुरु झाल्यावर मंदिरात गेली होती. तिची आई घरातच होती. मंदिरात गेल्यावर चिमुकली गोंगाट करू लागल्यामुळे तिच्या बहिणीने तिला घरी जाण्यास सांगितले आणि ती एकटीच मंदिराच्या बाहेर पडून घरी जात असताना आरोपी कंपनीतून घरी जात असताना अंधाराचा फायदा उचलून मुलीला उचलून नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. संभाजी धवारे असे आरोपीचे नाव असून तो एका कंपनीत सुरक्षा रक्षक आहे.