Ashish Sakharkar Passes Away: मराठमोळा बॉडी बिल्डर आकाश साखरकरचं निधन

बुधवार, 19 जुलै 2023 (09:25 IST)
Ashish Sakharkar Passes Away: मराठमोळा जगविख्यात बॉडीबिल्डर आकाश साखरकर यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. त्यांनी देशात-परदेशात अनेक स्पर्धा जिंकून मिस्टर इंडिया, मिस्टर युनिव्हर्स, महाराष्ट्रश्री खिताब पटकावले. आशिष साखरकर हे बॉडी बिल्डिंग जगात मोठं नाव आहे.

आशिष गेल्या काही दिवसांपासून दीर्घ आजाराशी लढत होते. अखेर त्यांची झुंज अपयशी ठरली आणि त्यांची प्राण ज्योती मालवली. आशिष हे महाराष्ट्रातच नव्हे तर अवघ्या भारतात आयकॉन होते. त्यांना चार वेळा मिस्टर इंडिया, चार वेळा फेडरेशन कप विजेते, मिस्टर युनिव्हर्स रौप्य आणि कांस्य, मिस्टर आशिया रौप्य , शिवछत्रपती पुरस्कार आणि युरोपियन चॅम्पियनशिप असे पुरस्कार मिळाले आहे. आशिष यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहे. त्यांचे चाहते त्यांना सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली अर्पण करत आहे. 
Edited by - Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती