अपात्रतेच्या मुद्द्यावरुन शिवसेनेच्या ४० आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी नोटिसा पाठवल्या होत्या. या नोटिशींना उत्तर देण्याची मुदत काल संपली होती, पण उद्धव ठाकरेंच्या समर्थक आमदारांनी उत्तर न देता थेट केराची टोपली दाखवली होती.
पण आता त्यांनी या नोटिशींना उत्तर दिलं आहे. हे उत्तर का दिलं याबबत खुलासाही ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. ठाकरे गटानं सांगितलं की, कायदेशीर सल्ला घेत विधानसभा अध्यक्षांच्या नोटीशीला एकत्रित उत्तर देण्यात आलं आहे. सुनावणी आणि कायदेशीर पेच टाळण्यासाठी वकिलांचा सल्ला घेत हे उत्तर देण्यात आलं आहे.
दरम्यान, मुदत संपल्यानंतरही ठाकरे गटाच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या नोटिशीला उत्तर दिलं नव्हतं. आम्हाला या नोटिशीला उत्तर देण्याची गरज नाही, अशी भूमिका ठाकरे गटानं मांडली होती. पण पुढील कायदेशीर पेच टाळण्यासाठी त्यांनी या नोटिशीला उत्तर दिलं आहे.