कोरोनाची रुग्ण संख्या घटताच ऑक्सिजनची मागणीही निम्याने घटली

मंगळवार, 25 मे 2021 (08:32 IST)
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचे वाढलेले रुग्ण आणि त्यातही अतिगंभीर, गंभीर रुग्णसंख्येत झालेली वाढ यामुळे ऑक्सिजनची दैनंदिन मागणीही दुपटीने वाढली होती. मात्र, मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्येत घट होत असून ऑक्सिजनची मागणीही कमी झाली. रुग्णसंख्या कमी झाल्याने आणि ऑक्सिजन वापराबाबतच्या उपाययोजनांमुळे बचत झाल्याने ऑक्सिजनची मागणी घटली.
 
एप्रिलच्या मध्यात महापालिका रुग्णालयासाठी दिवसाला 50 मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी होती. आता दिवसाला 25 मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी असून निम्याने घटली. 
 
ऑक्सिजनचा पुरवठा मर्यादित असल्यामुळे आणि मागणीत वाढ झाल्याने ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली होती. महापालिका हॉस्पिटलमध्ये दिवसाला लिक्विड ऑक्सिजन 50 मेट्रिक टन आणि खासगी हॉस्पिटलला 30 मेट्रिक टन ऑक्सिजन लागत होता. 
 
मे महिन्यातील दुसऱ्या पंधरवड्यापासून शहरातील रुग्णसंख्येत मोठी घट होऊ लागली. शहरातील रुग्णसंख्येचा आलेख उतरणीस आला. रुग्णसंख्या कमी होत दिवसाला 450 पर्यंत खाली आली. यामध्ये गंभीर आणि ऑक्सिजनची गरज असणाऱ्या रुग्णसंख्येत घट झाली. परिणामी, ऑक्सिजनच्या मागणीतही घट झाली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती