नागपूर विधानभवनावर तब्बल १ लाख लोकांचा मोर्चा निघणार

शुक्रवार, 2 डिसेंबर 2022 (21:40 IST)
हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी आक्रमक पवित्रा घेऊन सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारला घेरणार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, पीक विम्याचा मुद्दा, गगनाला भिडलेली महागाई आणि राज्यपालांची सततची वादग्रस्त विधाने या मुद्द्यावरू राष्ट्रवादी सरकारला घेरणार आहे. नागपूरमध्ये अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली नागपूर विधानभवनावर तब्बल १ लाख लोकांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसचा हा मोर्चा शरज पवारांच्या नेतृत्वाखाली निघणार आहे.  यंदा १९ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. या हिवाळी अधिवेशनादिवशी काढण्यात येणाऱ्या मोर्चाबाबत माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माहिती दिली.
 
राज्यात गेल्या चार महिन्यांपूर्वी सत्तांतर झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत भाजपासोबत युती करून राज्यात शिंदे-फडणवीस सरकारची स्थापना केली. एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फुट पडली. दरम्यान, या सरकारला आता जवळपास ४ महिने उलटून गेले आहेत. मात्र, ओला दुष्काळाचा मुद्दा, पीक विम्याचा प्रश्न, महागाई, राज्यपालांची विधाने, मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार यावरुन विरोधी पक्ष आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. यासाठीच्या एकत्रित रणनीतीसाठी महाविकास आघाडीची बैठकही मुंबईत पार पडली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती