प्रतिबंधात्मक उपाय म्हणून विधान भवनाची कामाची वेळ दोन सत्रांत विभागली

बुधवार, 12 जानेवारी 2022 (15:09 IST)
राज्यात मंत्री आणि आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. मंत्रालयात आणि विधान भवनातील कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. विधानभवनात गर्दी होऊ नये आणि कर्मचाऱ्यांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी कामाची वेळ दोन सत्रांत विभागली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात कर्मचाऱ्यांना कामावर बोलवण्यात येणार आहे. राज्य सरकारने असा आदेश जारी केला आहे.
 
राज्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कार्यालयातील उपस्थिती नियंत्रित करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने सचिवालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची विभागणी दोन सत्रांत केली आहे. यानुसार पहिले सत्र सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत असेल. तर दुसरे सत्र दुपारी १ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत असेल. निर्देशानुसार दोन सत्रांत कर्मचाऱ्याची विभागणी करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती