बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद विकोपाला गेला

गुरूवार, 27 ऑक्टोबर 2022 (08:03 IST)
शिंदेंनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत गेलेले आमदार बच्चू कडू आणि भाजप समर्थक अपक्ष आमदार रवी राणा यांच्यात सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, रवी राणा यांच्या आरोपांमुळे संतप्त झालेल्या बच्चू कडू यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. आता या वादादरम्यान राज्य सरकारमधील मंत्री आणि शिंदे गटातील ज्येष्ठ नेते दीपक केसरकर यांनी बच्चू कडूंबाबत मोठं विधान केलं आहे. बच्चू कडू हे ज्येष्ठ नेते आहेत, लवकरच ते मंत्रिपदी दिसतील, असा विश्वास दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे.
 
बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद विकोपाला गेला असताना त्याबाबत दीपक केसरकर म्हणाले की, बच्चू कडू हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या पक्षामध्ये दोन आमदार आहेत. त्यामुळे इतर आमदारांच्यावतीने ते बोलत असतील तर त्यामधील वस्तुस्थिती मला माहिती नाही. बच्चू कडू हे लवकरच मंत्रिपदी दिसतील, अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. मात्र जी व्यक्ती मंत्री बनणार आहे, तिने थोडा संयमही बाळगला पाहिजे, असं मला वाटतं, असा सल्ला दीपक केसरकर यांनी दिला.
Edited by: Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती